हळदीतील फटाक्यांच्या आतषबाजीने मुलाचा डोळा झाला निकामी

Foto
हळदीतील फटाक्यांच्या आतषबाजीने मुलाचा डोळा झाला निकामी
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): हळदीच्या कार्यक्रमादरम्यान फटाका
फुटल्याने सतरावर्षीय मुलाचा डावा डोळा कायस्वरूपी निकामी झाला आहे. ही घटना रांजणगाव शे.पुं. येथे बुधवारी (दि.६) रात्री १०.३० च्या सुमारास घडली. वेदांत इंगळे असे जखमी मुलाचे नाव आहे.
वेदांत इंगळे (रा. रांजणगाव शे.पुं.) येथे कुटूंबासह वास्तव्यास
आहे. त्याने नुकतीच दहीवीची परीक्षा दिली आहे. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या बोराडे कुटुंबीयात लग्न असल्याने हळदीचा कार्यक्रम सुरू होता. रस्त्यावर डीजे लावून फटाके फोडले जात होते. त्यावेळी वेदांत त्याच्या घराच्या गॅलरीत उभा असताना अचानक फटाका उडून त्याच्या डाव्या डोळ्याला लागला. त्यास जखमी अवस्थेत कुटूंबियानी छत्रपती संभाजीनगर
येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. गुरूवारी त्याच्या डोळ्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली असून, त्याचा डावा डोळा कायमचा निकामी झाल्याचे त्यांच्या वडीलांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोह मंगेश मनोरे करत आहे. गल्लीत डीजे कडक लावणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions